विनोदगुरुजींची साठी शांत

५ जुलै २००९ या दिवशी गुरुजींना तिथीने ६० वर्षे पूर्ण झाली.
या निमित्त शांति-मंदिरमध्ये उग्ररथ शंतिचे आयोजन केले होते.
सुरुवातीला पुण्याहवाचन त्यामध्ये महागणपतीपूजन, मातृकापूजन, वरूणपूजन झाले.
नंतर नांदीश्राध्द झाले.
ब्रह्मवृंदाने विनोद पतीपत्नीवर मंत्रयुक्त जलाभिषेक केला.
त्यानंतर हवनासाठी ब्रह्मवृंदाला वर्णी दिली गेली.
नवग्रहांचे हवन, महामृत्युंजयाचे हवन, नक्षत्रदेवतेचे हवन, मार्कंडेय मुनींसाठी हवन, सप्त चिरंजींवांसाठी हवन झाले.
सर्वारिष्टनिवारणासाठी भात व उडीदडाळीचा बली दिला गेला.
नवग्रह, ब्रह्मादिमंडल व मार्कंडेयाचे पूजन केले गेले.
पूर्णाहूती झाली.
त्यानंतर विनोद पतीपत्नींना सुवासिनींनी औक्षण केले.
समन्वय व सनातनने हार घालून सत्कार केला आहेर दिला.
प्रसादाचे लाडू दिले गेले.
नंतर ब्राह्मणांना दशदाने, भोजन, विडा, दक्षिणा दिली.
त्यांचे आशीर्वाद विनोद कुटंबाने घेतले.
या कार्यक्रमासाठी निवडक कुटुंबीय व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुण्याहवाचन-

हवन-